कळमसरेत श्री गुरुदेव दत्त जयंती सोहळा व हरिनाम सप्ताह संपन्न

अमळनेर प्रतिनिधी | तालुक्यातील कळमसरे येथे दत्त मंदिर चौकात श्री दत्त जयंतीनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

कळमसरे येथे वैकुंठवासी हभप गुरुवर्य विठ्ठल महाराज(मोठे बाबा) यांच्या कृपाआशीर्वादाने, वैकुंठवासी हभप अंबादास महाराज यांच्या प्रेरणेने व नवनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाने दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यात दररोज काकडा आरती व सायंकाळी हरिपाठाचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार दि. १७ डिसेंबर रोजी हभप दगडु महाराज बामनोदकर यांचे कीर्तन झाले. शनिवार दि. १८ डिसेंबर रोजी श्री दत्तप्रभु जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हभप विजय महाराज काळे पिंपळनेरकर कीर्तनाचा कार्यक्रम झाला. रविवार २० डिसेंबर रोजी हभप गोविंद महाराज वरसाडेकर यांचे काल्याचे किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. यानंतर कळमसरे सह परिसरातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Protected Content