चाळीसगाव, प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील कळमडू येथील शेत शिवारातील पळसाच्या झाडाला दोरीने गळफास लावून १६ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील कळमडू येथील अजय निंबा सुर्यवंशी (वय-१६ रा. कळमडू ता. चाळीसगाव) या तरूणाने नकट्या धामणी शिवारातील पळसाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवार, ४ जूलै रोजी दुपारी उघडकीस आली आहे. अजय हा जन्मताच मनोरूग्ण होता. त्यामुळे त्याच्यावर औषधोपचार हे सुरू होते. परंतु हि धक्कादायक घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रविण कैलास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास श्री. मांडुळे हे करीत आहेत.