जळगाव, प्रतिनिधी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय इ-पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेत जळगावचे सुनील न्हानू दाभाडे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने स्वदेश संस्थान, इंडिया, भाभा विज्ञान क्लब व शांती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय इ-पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मानव सेवा शाळेतील कलाशिक्षक सुनील दाभाडे यांनी सहभाग घेतला होता. त्यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.