मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र सरकारने राजकारण न करता विरोधीपक्ष नेत्यांना विश्वासात घ्यावं. वेळ पडली तर त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे बेळगावात जाऊन आंदोलन करायला तयार आहोत. ते यायला तयार आहेत का विचारा” अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
यावेळी राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगावातून रात्रीच्या अंधारात पोलिसांनी ज्या पद्धतीने हटवला, त्याचा धिक्कार करावा तेवढा कमी. त्याविषयी विरोधीपक्ष बोलायला तयार नाही. चार दिवसांपूर्वी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. त्यांचंच सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये रात्रीच्या वेळी, दिवे बंद करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला जातो, हे कसले लक्षण?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.