कर्नाटकात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात गुन्हा


नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
पीएम केअर्स फंडविरोधात संभ्रम पसरवल्याचा आरोप करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात एका वकिलाने कर्नाटकात गुन्हा दाखल केला आहे.

 

पीएम केअर्स फंडाबाबत काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरुन दिशाभूल करणारे ट्वीट केल्याचा आरोप वकील के व्ही प्रवीण यांनी केला करत कर्नाटकच्या शिवमोग्गामध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 153 आणि 505 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पीएम केअर्स फंड हा घोटाळा असून हा फंड कॅगच्या कक्षेबाहेर असू शकतो, जेणेकरुन या फंडमधून केलेल्या खर्चावर तसेच वापरावर कोणाची नजर नसेल, म्हणूनच त्याची स्थापना झाल्याचा आरोपही काहींनी व्यक्त केला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर कॉंग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Protected Content