कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना दुसऱ्यांदा कोरोना

 

 

 बंगळुरू : वृत्तसंस्था । आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. हलका ताप आल्याने त्यांनी चाचणी केली होती. त्यात त्यांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

‘मला हलका ताप होता. त्यामुळे मी चाचणी करण्याचा निर्णय घेतला त्यात मला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. माझी तब्येत ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माझी विनंती आहे की, जे कुणी मागच्या दिवसात माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी काळजी घ्यावी आणि वैयक्तिक क्वारंटाइन व्हावं’ असं विनंती करणारं ट्वीट येडियुरप्पा यांनी केलं आहे.

 

मागच्या दोन दिवसांपासून येडियुरप्पा यांना ताप येत आहे. त्यांना बंगळुरुच्या रमैया मेमोरिअल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ७८ वर्षीय बीएस येडियुरप्पा यांना गेल्या वर्षीही  लागण झाली होती. ऑगस्ट महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Protected Content