Home धर्म-समाज कर्नल ओहरी यांच्याहस्ते कोरोनाविरोधात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

कर्नल ओहरी यांच्याहस्ते कोरोनाविरोधात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

0
27

 

भुसावळ, प्रतिनिधी । देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डॉक्टर,सफाई कर्मचारी, पोलीस अधिकारी यांचे मनोबल वाढविण्यासाठी आर्मीतर्फे शहर पोलीस स्टेशन येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते केक कापण्यात आला.

भुसावळ येथील आर.पी.डी.चे आर्मी कॅम्पचे कर्नल के.जे. ओहरी यांनी कोरोना सोबतचे युद्ध कसे जिकायचे आहे याबाबतच्या सूचना दिल्यात. तसेच सर्वांनी सोशल डिस्टनसींग ठेवा, तोंडाला मास्क लावा, कोरोना सारख्या महासंकटात आज रोजी सर्वात महत्वाचा दुवा म्हणून सफाई कर्मचारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच हे सफाई कर्मचारी स्वछतेसाठी फिरत असल्याने त्यांचे कौतुक केले. तसेच इतर कर्मचाऱ्यांना मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले.


Protected Content

Play sound