जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – शहरात विविध कार्यक्रमानिमित्त ऐन उन्हाच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना भाजपा पदाधिकाऱ्यातर्फे पाण्याच्या बॉटल्सचे वाटप करण्यात आले.
शहरात गुरुवारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिवसभर तसेच रात्री उशिरापर्यंत सामाजिक सुरक्षा कामासाठी तैनात करण्यात आले होते. तसेच आज शुक्रवारी सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते जिल्ह्यात दाखल झाले आहेत, या नेत्यांसह वाहतूक व्यवस्था सुरक्षा कामासाठी पुन्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. ऐन उन्हाच्या वेळेत या कर्मचाऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचे जळगाव भाजपा महानगर पदाधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यावर लागलीच ठिकठिकाणी पाण्याच्या पाण्याच्या बॉटल्सचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस मिलिंद चौधरी, उपाध्यक्ष विक्की सोनार, राहुल मिस्तरी, चिटणीस रोहित सोनवणे, सदस्य भूषण भोळे, राहुल पाटील, दिनेश मराठे, मयूर चौधरी, कल्पेश कासार उपस्थित होते.