पाचोरा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पीक कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाचा बोझा सातबारा उतारावर घेण्यासाठी १ हजार ३६० रुपयांची लाच घेणाऱ्या खाजगी पंटरला जळगावच्या लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगीहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे होते. भगवान दशरथ कुंभार (वय 44 रा. बांबरुड ता.पाचोरा जि.जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे लासगाव शिवारात त्यांच्या आईच्या नावाने शेत आहे. आईच्या नावे सामनेर येथील बँक ऑफ बडोदा शाखेत पीक कर्ज म्हणून १ लाख ३० हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. मंजूर झालेले पीक कर्जाचा बोजा शेत जमिनीचे सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदार यांनी बांबरुड तलाठी कार्यालयात गेले होते. यावेळी खाजगी पंटर भगवान कुंभार याने सांगितले की, माझे तलाठी आप्पांचे चांगले संबंध आहेत, तुमच्या आईचे नावे मंजूर झालेल्या कर्जत पीक कर्जाचा बोजा उताऱ्यावर लावण्याच्या काम तलाठी यांच्याकडून आणून देतो असे सांगून त्याने १ हजार ३६० रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी जळगाव शाखेच्या लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली त्यानुसार पथकाने सापळा रचून बुधवारी १७ मे रोजी दुपारी संशयित आरोपी भगवान कुंभार याला लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
यांनी केली कारवाई
पोलीस उपाधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती एन एस जाधव, पोलीस नाईक ईश्वर धनगर, राकेश दुसाने, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील, रवींद्र घुगे, पोलीस नाईक जनार्दन पाटील, पोलीस नाईक किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर यांनी कारवाई केली आहे.