पारोळा प्रतिनिधी । करमाड खुर्द तालुका पारोळा येथे एका 20 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उमेश खुशाल पाटील वय वीस असे मृत तरुणाचे नाव आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमेश आणि त्याची आई हे दोघे रहात होते. काल तारीख 24 रोजी त्याची आई खडके तालुका एरंडोल येथे गेली होती. तर उमेश हा एकटाच घरी होता. आज पहाटे दीपक पाटील हा त्याला पाहण्यासाठी त्याचा घरी गेला असता उमेश ने दोरीने आपल्या हॉलमध्येच गळफास घेतली असल्याचे दिसून आले. नातेवाईक मदतीने उमेशला खाली उतरून उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या तपासून पावणे बारावाजता मृत घोषित केले आहे. याबाबत समाधान पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार आशिष चौधरी हे करीत आहेत. दरम्यान उमेश हा शिक्षण व शेती करीत होता त्याने आत्महत्या का केली हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.