करगाव शिवारात वयोवृध्द महिलेचा मृतदेह आढळला

चाळीसगाव प्रतिनिधी । गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वी एक मनोरूग्ण वयोवृद्ध महिला ही आपल्या घरात कोणालाही काही एक न सांगता कोठेतरी गेल्याचे निष्पन्न झालेले असताना तालुक्यातील करगाव शिवारात आज त्याच वयोवृद्ध महिला मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कमलाबाई पंढरीनाथ कदम (वय-७९ रा‌. जुने भिमनगर, पॉर हाऊस) ता. चाळीसगाव हि वयोवृद्ध महिला मनोरुग्ण होती. ती गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वी घरातून कोठेतरी निघून गेलेली असताना तालुक्यातील करगाव शिवारात तरवाडे येथील शेतकरी शांताराम पुंजु पावले (गट क्र. ७३) याच्या शेताच्या बांधावर कमलाबाई कदमाचा मृतदेह आज ११:३० वाजेच्या सुमारास (वेळ निश्चित नाही) आढळून आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलगा रविंद्र पंढरीनाथ कदम (रा. जुने भिमनगर, पॉर हाऊस) ता. चाळीसगाव यांना कळविले असता. माझीच आई असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेबाबत पोलिस पाटील अशोक चव्हाण यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास दत्तू महाजन करीत आहे. 

Protected Content