करंजी येथील पूरग्रस्तांना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील करंजी येथील पुरग्रस्तांना जिल्हा प्रशासन, रेडक्रॉस सेवा सोसायटीच्या वतीने तहसीलदार अनिल गवांदे यांच्याहस्ते घरगुती साहत्यांचे वाटप करण्यात आले.

 

पारोळा तालुक्यातील करंजी येथे ४ ऑगस्ट रोजी अचानक झालेल्या ढगफूटीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होवून पाणी गावात आले आहे. यात काही नागरीकांचे घरी जमीनदोस्त झाली होती. संसारोपयोगी वस्तू पाण्यात वाहून गेले होते. यासंदर्भात तालुकाप्राशासनाच्या वतीने तातडीने पंचनामा केला. यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अहवाल सादर केला.  सर्व घरांचे व शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.

 

दरम्यान आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून रेडकॉस सोसायटी यांच्या मार्फत ५० कुटुंबांना संसारोपयोगी वस्तू देण्यात आले आहे.  करंजी सरपंच भैया रोकडे, तलाठी निकम आप्पा, उपसरपंच नामदेव महाजन, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास रोकड़े, करंजी पोलिस पाटिल कल्पना रोकड़े, विकास सोसायटी चेअरमन  माधवराव पाटील, माजी.ग्रा.पं.सदस्य संजय पाटिल, आनंदा पाटिल, गणेश पाटील, कैलाश पाटिल, समाधान सूर्यवंशी, गुलाब माळी, दीपक पाटील, मोहन पाटील, भाऊसाहेब माळी, समाधान पाटील, समाधान पाटील, विशाल रोकड़े, धोंडू भील, काशीनाथ पाटील, ग्रा.पं. सदस्य उत्तम भील, संजय पाटील, बापू माळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content