कमल मेडिकल व गीताई डिस्ट्रीब्युटर्सतर्फे ‘नॉन-प्रॉफीट’ तत्वावर वैद्यकीय सामग्री उपलब्ध

भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी येथील कमल मेडिकल आणि गीताई डिस्ट्रीब्युटर्सतर्फे नॉन-प्रॉफीट तत्वावर मास्क व सॅनिटायझर्ससह अन्य सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सध्या कोरोनाच्या प्रादूर्भावाच्या पार्श्‍वभूमिवर मास्क, सॅनिटायझर्स आणि अन्य सामग्रीला मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण झाली आहे. दरम्यान, समाजाची ही गरज लक्षात घेऊन येथील कमल मेडिकल व गीताई डिस्ट्रीब्युटर्स यांच्यातर्फे नो प्रॉफीट नो लॉस अर्थात ना-नफा-ना-तोटा या तत्वावर कोरोनाच्या प्रतिकाराची सामग्री उपलब्ध करण्यात आली आहे. यात मास्क, सॅनिटायझर्स, ग्लोव्हज, गाऊन्स आदी सामग्रीचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात भुसावळ येथील डाक खात्याच्या कर्मचार्‍यांना या सामग्रीचे वाटप करण्यात आले. लवकरच अन्य शासकीय कर्मचार्‍यांना ही सामग्री उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती गीताई डिस्ट्रीब्युटर्सचे संचालक अजित बेहरा यांनी दिली आहे. भुसावळकरांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content