रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आसारबर्डी परिसरातील एका घरातील कपाटातून सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोकड असा एकुण ४८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रावेर शहरातील आसरा बर्डी भागातील प्रमिला विकास सवर्णे हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्याच्या घरातील कपाटाचे कुलूप तोडून सोन्याचे ३० हजार रुपये किमितीचे ८ ग्राम वजनाचे सोण्याचे गहु मन्याची पोत, ८ हजार रुपये किमतीचे ४० भार चांदीचे कळे तसेच १० हजारांची रोकड असा एकुण ४८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले. दरम्यान, प्रमिला सवर्णे यांनी त्यांचे पती विकास लहाणु सवर्णे यांच्यावर संशय घेतला असून त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार इस्माईल शेख करीत आहे.