भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील कन्हाळा बु ॥ गावाजवळ बेकायदेशीरित्या दुचाकीवर तीन कॅनमध्ये २४ हजार ५०० रूपये किंमतीची १०५ लिटर गावठी हातभट्टीची दारू पोलीसांनी हस्तगत केली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, संशयित आरोपी हिरू बुधू गवळी हा दुचाकी (जीजे ५, ईपी ७७०) वरून तीन कॅनमध्ये २४ हजार ५०० रूपये किंमतीची तयार गावठी हातभट्टीची दारू बेकायदेशीरित्या घेवून जात असतांना पोलीसांनी पकडले. यावेळी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पोलीसांनी कारवाई करत १०५ लिटर दारू जप्त केली आहे. संशयित आरोपी गवळी यांच्या विरोधात प्रोव्हीजन कायदा अन्वये आणि संचारबंदी कायद्यान्वये भुसावळ तालुका पोलीसात भादवी कलम २७०,२७१, १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. रामकृष्ण कुंभार, पोहेकॉ अजय माळी, विठ्ठल फुसे, प्रविण पाटील, रियाज काझी, होमगार्ड भूषण पाटील यांनी ही कारवाई केली.