कठोर निर्बंधांवर व्यापक चर्चा — राजेश टोपे

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याबाबत मुख्यमंत्री सर्व संबंधितांशी व्यापक चर्चा करीत आहेत असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले

 

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी टास्क फोर्स, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्या उपस्थित महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा सुरु आहे याबाबतची माहिती स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘दिली.

 

 

कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या ही चिंता वाढवणारी आहे. या अनुषंगाने संपूर्ण आढावा घेण्याचं काम सुरु आहे. बेड्स, औषधे, ऑक्सिजन याबाबत चर्चा सुरु आहे. कुठे काय उणिव आहे त्याबाबत व्यापक चर्चा झाली. ज्या ठिकाणी निर्बंध पाळले जात नाही त्याठिकाणी अधिक निर्बंध करुन गर्दी कशी टाळली जाईल याबाबत चर्चा झाली. निर्बंधावर योग्य अंमलबजावणी होण्याची गरज आहे. याबाबत चर्चा करुन निर्णय होईल. अजून निर्णय घेण्यात आलेला नाही.

 

लॉकडाऊन हा शब्द न वापरता निर्बंध लावले आहेत. सरकारी कार्यालये वर्क फ्रॉम होम केले आहेत. नाईट कर्फ्यू लावले आहेत. जिथे निर्बंध लावल्यानंतर गर्दी वाढतेय. त्यामुळे कडक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे याबाबत बारकाईने निर्णय घेण्याबाबत चर्चा सुरु आहे. लोकांनी काही दिवस नियमांचं पालन केलं तर लॉकडाऊन लावण्याची गरज भासणार नाही. ज्यावेळी संसाधनं संपतात त्यावेळी चैन ब्रेक करण्यासाठी तातडीचा इलाज हा लॉकडाऊन असतो. लोक स्वयंशिस्त पाळत नसल्याने निर्बंध कडक करावे लागत आहेत. तोंडातल्या शिंतोड्यातूनच कोरोनाचा संसर्ग होतो. त्यामुळे नियम पाळलं तर परिस्थिती नियंत्रणात येईल. लोकांनी अंगावर घेऊ नये. लगेच टेस्ट न केल्याने तरुणांनाही ऑक्सिनज बेड्सची गरज लागत आहे. लक्षणे दिसली की तातडीने टेस्ट करावे. ज्यांना बेड्सची आवश्यकता नाही त्यांनी आयसीयूचा बेड घेऊ नये. याबाबतच्या सूचना बैठकीत आम्ही देतोय. सगळ्या संसाधनांचा व्यवस्थित पुरवठा व्हावा त्याबाबत चर्चा सुरु आहे.

 

 

लोकलबाबतही आढावा घेतलेला आहे. त्याही बाबतीत काही गाईडलाईन्स जाहीर होतील. लोकलमध्ये कसं राहावं याबाबत सूचना दिल्याल जातील. कोणत्याही परिस्थितीत संसर्ग टाळावे. महाराष्ट्रात आरोग्याची व्यवस्था ठीक आहे. काही उणिवा आहेत. त्याबाबतच निर्णय घेतला जातोय.

 

Protected Content