जळगाव प्रतिनिधी । शहरातील सिंगापूर कंजरवाडा गावठी हातभट्टी उध्वस्त केली तर मोहाडी रोड गवळी वाडा परिसरात बेकायदेशीर दारू विक्रेत्यांवर एमआयडीसी पोलीसांनी छापा टाकून सुमारे ३५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत व दारू बनविण्याचे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. याप्रकरणी चार जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दारू बनविण्याची हातभट्टी नष्ट
पो.नि.विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, जितेंद्र राजपूत, मुदस्सर काझी, योगेश बारी, होगार्ड अजय चांदणे, ईश्वर पवार, रमेश वडर, राहुल पवार, होमगार्ड महिला कविता ताडे यांनी शहरातील सिंगापूर कंजरवाडा येथे छापा टाकून गावठी हातभट्टी दारू बनविण्याचे ३० हजार रूपये किंमतीचे कच्चे रसायन व साहित्य पोलीसांनी नष्ट केला. याप्रकरणी रंजना धिरज भाट (वय-३३) आणि योगेश महेश भट दोन्ही रा. सिंगापूर कंजरवाडा या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गवळी वाड्यात बेकायदेशी देशी दारू विक्रेत्यांवर कारवाई
शहरातील गवळी वाडा, मोहाडी रोड परिसरात बेकायदेशीर देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक विनायक लोकरे यांनी पथक रवाना केले. या पथकात सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील, पोहेकॉ सचिन पाटील, इमरान अली, इमरान अली, मुकेश पाटील, होमगार्ड धिरज भगत, भारती पाटील यांनी कारवाई करत राखी जनार्दन नेतलेकर या महिलेच्या ताब्यातून २ हजार १८४ रूपये किंमतीची देशी दारू तर सुष्मा रवि बाटुंगे रा. गवळीवाडा हिच्या ताब्यातून २ हजार ९०० रूपये किंमतीचे गावठी हातभट्टीची दारू मिळून आले. दोघांकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.