जळगाव प्रतिनिधी । शहरातील कंजरवाडा परिसरातील बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर आज एमआयडीसी पोलीसांनी कारवाई केलीअसून सुमारे १ लाख ८६ हजार हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दहा महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे गावठी दारु तयार येवून तिची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना मिळाली. त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार आज मंगळवारी दुपारी प्रताप शिकारे यांनी सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, इमरान सैय्यद यांच्यासह महिला पोलीस व होमगार्ड यांच्या पथकासह कंजरवाडा परिसरातील गावठी दारुच्या अड्डयावर छापा टाकला. यात पथकाने राजेश वसंत माचरे वय ८० रा. संजय गांधी नगर, संजय बट्टु नेतलेकर वय ६६ रा. जाखनीनगर, उमेश रमालाल तांबट वय ३० रा. कासमवाडी, राजेश गणपत भाट वय ५२ रा. नवलकॉलनी, वनाबाई देवसिंग बाटुंगे वय ७५ , नैनीता मंगल गुमाने वय ४९ , विमलबाई शंकर बागडे वय ५५ तिन्ही रा जाखनीनगर, इंदुबाई उदयसिंग बागडे वय ५० रा. अंध शाळेच्या पाठीमागे, कंजरवाडा, उमेश मायकल नेतलेकर वय २१ रा. संजय गांधी नगर व बेबीबाई हिरा नेतले वय ६३ रा. संजय गांधी नगर यांच्यावर कारवाई केली. या कारवाईत पथकाने तयार गावठी दारु, कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण १ लाख ८६ हजार ४७० जप्त केल आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.