चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील आंबेडकरवादी विचारवंत प्रा.गौतम निकम लिखित खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड १ मधील आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्यांच्या छायाचित्रांचा समावेश असलेले प्रदर्शन औरंगाबाद येथील भाकपच्या राष्ट्रीय दलित हक्क अधिवेशनात लावण्यात आले असता त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रदर्शनाचे उद्धघाटन भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय महासचिव कॉ. डी. राजा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. गौतम निकम.कॉ.राम बाहेती.कॉ.प्रकाश रेड्डी, डॉ.श्रीधर पवार, वैशाली निकम,कॉ. सातपुते, कॉ.उके यांच्यासह भाकपचे पदाधिकारी व आदी उपस्थित होते. यावेळी अधिवेशनाला उपस्थित मान्यवरांनी व नागरिकांनी भेट देऊन प्रदर्शनाचे कौतुक करत खान्देशातील आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्यांच्या र्दुलक्षित कार्याला उजाळा मिळाला असल्याचे मत व्यक्त करत लेखक प्रा.गौतम निकम यांचे कौतुक केले. हे प्रदर्शन नुकतेच नाशिक येथे संपन्न झालेले विद्रोही साहित्य संमेलनात भरविण्यात आले होते. .तेथे देखील उपस्थित साहित्यिक,विचारवंतांनी प्रदर्शनाला भेट देत या अनोख्या प्रदर्शनाचे मनापासून कौतुक केले होते.