औरंगाबाद (वृत्तसंस्था) रशिया आणि कझाकिस्तानमधून परत आलेल्या महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शहरातील रुग्णालयात भरती झालेल्या महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे. ही महिला रशिया आणि कझाकिस्तानमध्ये गेली होती. भारतात परतल्यानंतर तिच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आली आहोती. त्यानंतर तिचे नमुने पुण्यात तपासणीसाठी पाठवले होते. आज तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 32 वर पोहोचला आहे.