औरंगाबादमध्ये भीषण अपघात ; ४ भाविक ठार

Accident

औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबाद-जालना रस्त्यावरील करमाडजवळ पहाटे चारच्या सुमारास ट्रेलर आणि क्रूझरमध्ये झालेल्या भीषण अपघातात देवदर्शनाहून घरी परतणारे ४ भाविक ठार झाले आहेत.
या संदर्भात अधिक असे की,  औरंगाबाद-जालना रस्त्यावरील करमाडजवळ पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात देवदर्शनाहून घरी परतणाऱ्या चार भाविकांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. औरंगाबादहून सिंदखेडराजाकडे जाणारी क्रूझर, उभ्या असलेल्या ट्रेलरला धडकली. या धडकेत क्रूझरमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Protected Content