औरंगाबाद (वृत्तसंस्था) नामांतराच्या बाबतीत ज्या काही तांत्रिक त्रुटी आहेत, त्या लवकरात लवकर दूर केल्या पाहिजेत आणि औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामकरण झालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केली.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पाटील औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना औरंगाबादचे नाव बदललेच पाहिजे, असे ते म्हणाले. नामांतराच्या बाबतीत ज्या काही तांत्रिक त्रुटी आहेत, त्या लवकरात लवकर दूर केल्या गेल्या पाहिजेत,’ असे ते म्हणाले. दरम्यान, तत्पूर्वी त्यांनी संघाच्या प्रतिनिधींसोबत सकाळी त्यांची बैठक झाली. त्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली.