चाळीसगाव, प्रतिनिधी | ओबीसी समाजाच्या जातीनिहाय जनगणना करून कृषी विरोधातील तीन कायदे तातडीने रद्द करण्याची मागणी राष्ट्रीय पिछडा वर्गाकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
देशात ओबीसी समाजाच्या जातीनिहाय जनगणना करावी, शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन कृषी कायदे रद्द करावे आदी मागण्या ह्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाने तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास २५ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर देशव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे. तसेच या दिवशीही सरकारने गांभीर्याने विचार केला नाही तर १० डिसेंबर रोजी भारत बंद पुकारण्यात येईल असेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. निवेदनावर जिल्हा संघटक गोकुळ पाटील, प्रा. गौतम निकम, मुकेश नेतकर, राहुल मोरे, अनिल अहिराळे, अनिल ठाकरे, नगरसेवक चिरागोद्दिन शेख, सागर धिवर, प्रशांत निकम, पवन अहिरे, मयुर खरात, रूपेश पवार, रमेश चौधरी, अकील शेख, सागर निकम, नेंब खान, हिरामण शैदाणे, संगम गवले, विजय मोरे, मिनल खान, हरशत शेख व जुबेर मिरझा आदींनी सह्या केल्या आहेत.