एरंडोल, प्रतिनिधी । येथे महात्मा फुले समता परिषद व सर्व ओबीसी समाज संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आज गुरुवार २६ नोव्हेंबर रोजी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी व विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण व अभिवादन करण्यात आली त्यानंतर उपस्थितांनी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान प्रस्तावनाचे सामूहिक वाचन करण्यात आले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, अरुण माळी, अशोक चौधरी, शालिग्राम गायकवाड, गोपाल पाटील, समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सरिता माळी, निवेदिता ताठे, भारती काळे, भारती मस्के, राकेश कंडारे, प्रकाश महाले, विठ्ठल आंधळे, मदन भावसार, डॉ. राजेंद्र चौधरी, दुर्गादास महाजन, शांताराम महाजन, प्रताप चौधरी, रमेश महाजन, विजय महाजन, प्रकाश महाजन, रुपेश महाजन, संजय महाजन, राजेंद्र महाजन, गोपाल बडगुजर, संजय शिंपी, रामभाऊ गांगुर्डे, असलम पिंजारी, मोसिम खाटीक, विक्रम सैदाने, कैलास महाजन, राजेश शिंपी आदी उपस्थित होते.
मोर्चाच्या यशस्वीतेसाठी अरुण महाजन, गजानन महाजन, सागर महाजन, योगेश महाजन, नीलेश देवरे, कमलेश महाजन, सोमनाथ महाजन,सचिन महाजन आदी कार्यकर्त्यांनी कामकाज पहिले.