चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील ओढरे विविध कार्यकारी विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाल्याने काल शनिवार दि. २८ मे रोजी चेअरमन व व्हाइस चेअरमनची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी चेअरमनपदी नवलसिंग राठोड तर व्हाइस चेअरमन म्हणून मांगु निकम यांची निवड करण्यात आली आहे.
तालुक्यातील ओढरे विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या संचालकाची पंचवार्षिक निवडणूक २० एप्रिल रोजी माघारीच्या दिवशीच बिनविरोध झाली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात एकूण १३ जागा असलेल्या हि विकासो बिनविरोध झाली. त्यानंतर शनिवार, २८ मे रोजी चेअरमन व व्हाइस चेअरमन निवडीची प्रक्रिया उत्साहात पार पडली. यावेळी नवलसिंग शंकर राठोड यांची चेअरमन पदी तर मांगु राणू निकम यांची व्हाइस चेअरमन म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. याबाबत सर्व स्थरातून त्यांचे कौतुक होत आहे. तत्पूर्वी शिवाजी प्रताप चव्हाण, भीमा एकनाथ पवार, नामदेव चव्हाण, जगन परमा पवार, बाळू पाटील, रेवण पाटील व भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवडणूक बिनविरोध झाली आहे.