चोपडा प्रतिनिधी । येथील आर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये सोशल डिस्टन्सींगसह अन्य नियमांचे पालन करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल चोपडा येथे शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील, डॉ. तृप्ती पाटील शाळेचे प्राचार्य उमेश महाजन, समन्वयक अरुण सनेर उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंग,मास्क तसेच सॅनिटायझर चा वापर केला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे प्राचार्य यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या फोटो चे पूजन केले, तसेच सर्व विद्यार्थी व पालक ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील व डॉ. तृप्ती पाटील यांनी प्राचार्य, सर्व शिक्षक व कर्मचार्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.दिपाली टीचर यांनी शिक्षक दिनाचे महत्व समजावून सांगितले. तर प्राचार्य उमेश महाजन यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आदर्श शिक्षक जीवना बद्दल माहिती सांगितली.
यावेळी शिक्षकांसाठी ‘चिट उठावो’ या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश वाघ व आभार प्रदर्शन अंकिता जैन यांनी केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.