यावल, प्रतिनिधी । महाराणा प्रताप जयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनतर्फे ऑनलाईन वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहान गटात कुशलकुमार तर मोठया गटात गतीक प्रथम आला आहे.
या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्याबरोबरच राज्यातील जवळपास ९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे जयदीप भूषण महाजन या दोन वर्ष आठ महिन्याच्या बालकानेही आपला व्हिडिओ वकृत्व स्पर्धेसाठी पाठवला असून तो कौतुकास पात्र आहे . स्पर्धेचे विषय महाराणा प्रताप यांच्या स्वप्नातील भारत आणि कोवीड – १९ पासून देशाचे संरक्षण कसे करावे या विषयांवर खूप छान असा संदेश त्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पर्धकांनी दिला आहे. या स्पर्धेचा निकाल आज १६ मे रोजी ठरल्या प्रमाणे @devkantpatil1988 या फेसबुक पेजवर प्रसारित केला गेला .त्याच बरोबरच काही निवडक व्हिडिओ सुद्धा याच फेसबुक पेजवर प्रसिद्ध केले आहेत आणि दोन्ही गटांना प्रत्येकी तीन विजेते घोषित केले. यात लहान गटात प्रथम बक्षीस चाळीसगाव तालुक्यातील वाघाडी येथील कुशलकुमार नितीनकुमार माळी याला मिळाले. दुसरे बक्षीस पुणे येथी मयुरी जितेंद्र पाटील हिने पटकविले. उत्तेजनार्थ बक्षीस भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथील प्रणाली राजेंद्र पाटील व सतोद येथील पूजा दुर्गादास पाटील यांनी मिळविले. द्वितीय गटात प्रथम बक्षीस जळगाव येथील गतिक सत्यजित पाटील, दुसरे त्रिपुरा येथील योहित महेंद्र पाटील तर विरावली येथील दिपाली शिवाजी पाटील यांना देण्यात आले.