Home क्राईम ऐनपूर शिवारात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ऐनपूर शिवारात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0
37

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतात काड्या तोडत असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत दोन जणांवर निंभोरा पोलीस ठाण्यात पोक्सो व ॲस्ट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे १४ वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनीवारी १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता अल्पवयीन मुलगी आणि तिच्या ओळखीची रमाबाई अमोल अवसरमल हे दोघे ऐणपूर शिवारात काड्या तोडण्यासाठी गेल्या. त्याठिकाणी संशयित आरोपी नितीन मधुकर पाटील रा. ऐनपूर ता.रावेर हा तिथे दुचाकीवर आला. त्यानंतर माझ्यासोबत चल असे सांगून तिचा हात पकडून तिच्यावर अत्याचार केला. यासाठी रमाबाई अवसरमल यांनी देखील प्रोत्साहित केले. हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या कुटुंबियांना सांगितला. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी नितीन मधुकर पाटील आणि रमाबाई अमोल अवसरमल दोघे रा. ऐनपूर ता. रावेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे करीत आहे.


Protected Content

Play sound