रावेर, प्रतिनिधी | ऐनपूर येथील सुमारे २५० घरांच्या पुंवार्सानाचा प्रश्न सोडविण्यासाठी येथील बाधित नागरिकांनी स्मशानभूमीत आंदोलन केले. आंदोलकांनी स्मशानभूमीत ठाण मांडून पुनर्वसनाची मागणी केली. या आंदोलनात महिला व पुरुष सहभागी झाले होते.
ऐनपूर येथील सुमारे २५० नागरिकांची घरे हतनूर धरणाच्या ब्याक वाटरमुळे बाधित आहेत. पुनर्वसनाची मागणी करूनही अद्यापपर्यंत हा प्रश्न सुटलेला नसल्याने पुनर्वसनाच्या मागणीचा प्रश्न सोडविण्यासाठी नितीन जैतकर, अनिल वाघोदे, विजय अवसरमल, विजय भालेराव, राजू महाजन, मनोहर मराठे, युसुफ मौलाना, कैलास महाजन, मनोज सुतार, ज्ञानेश्वर चौधरी चंबाबाई अवसरमल, शैलाबाई अवसरमल, विंदाबाई अवसरमल यांच्यासह २५० नागरिकांनी स्मशानभूमीत जाऊन आंदोलन केले. आंदोलनाला जळगाव मध्यम प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता रुपेश हिरे, भुसावळ विभागाच्या कनिष्ठ अभियंता स्वाती थोरात, नायब तहसीलदार जे. एस. खारे, ऐनपूर भागाचे मंडळ अधिकारी टोंगळे. तलाठी यांनी भेट दिली. या घरांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडे फेब्रुवारी २०१९ मध्ये पाठवल्याचे लेखी पत्र जळगाव मध्यम प्रकल्प कार्यालयातून मागविण्यात येऊन त्यांना देण्यात आले.