Home Cities जळगाव ए. टी झांबरे विद्यालयात सामूहिक अथर्वशीर्ष पठण

ए. टी झांबरे विद्यालयात सामूहिक अथर्वशीर्ष पठण

0
31

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | लाडक्या बाप्पाचे जल्लोशात स्वागत आणि स्थापना झाली असून या बाप्पाची आपल्यावर असीम कृपादृष्टी रहावी, यासाठी ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. सामूहिक पठण कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह पालकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.यात ११ आवर्तने झाली. यावेळी शाळेला गणेशाची मुर्ती देणाऱ्या राममोहन शिवप्रकाश वर्मा या पालकांचा मुख्यध्यापिका प्रणिता झांबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अथर्वशीर्ष पठणाचे हे पहिलेच वर्ष असल्याने याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. गणपतीची आरती करून याची सांगता झाली. या उपक्रमासाठी मुख्यध्यापिका प्रणिता झांबरे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी पर्यवेक्षक नरेंद्र पालवे, कला शिक्षक सतीश भोळे, पराग राणे, डी. ए. पाटील, चंदन खरे, अशोक तायडे, अनिल शिवदे, तुषार सोनवणे आदी उपस्थित होते. यशस्वीत्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound