जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयचा मार्च २०२० ह्या वर्षांचा दहावीचा निकाल ९९.५२ टक्के लागला असून विद्यालयातून मयुरी विनोद महाजन ही विद्यार्थीनी ९८.८०टक्के गुण मिळवून पहिली आली आहे.
ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयचा मार्च २०२० ह्या वर्षांचा दहावीचा निकाल ९९.५२ टक्के लागला. निकालात मयुरी महाजन (९८.८० टक्के) प्रथम, खुशवंत सूनिल जाधव हा विद्यार्थी ९८ टक्के गुण मिळवून दुसरा आला. तर ऋतुजा अनिल सोनवणे ही विद्यार्थिनी ९७.८० टक्के गुण मिळवून तिसरी आली. विद्यालयातील २८ विद्यार्थी शेकडा ९० पेक्ष्या जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत. १२८ विद्यार्थी हे विशेष गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर ६२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.१५ विद्यार्थी द्वितिय श्रेणीत उत्तीर्ण झाले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, संस्थेचे कार्यकारणी सदस्य, प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, शालेय समन्वयक के.जी. फेगडे, मुख्याध्यापक डि.व्ही. चौधरी आणि सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.