एसबीआय बँकेसमोर केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रताप नगर येथील एसबीआय बँकेसमोर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी जनतेचा पैसा निवडक उद्यागपतींच्या हाती देण्याचे षडयंत्र केंद्र सरकार करत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, हिडनबर्ग अहवाल आल्यानंतर अदानी ग्रुपच्या कंपनीने केलेल्या आर्थिक गैरव्यवहार करून स्टेट बँक ऑफ इंडिया, एलआयसी बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक या संस्थांचे लाखो करोड रुपये बुडवण्याचे षडयंत्र केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून केल्याने शेअर मार्केटच्या निमित्ताने बाहेर आले आहे. अशा वेळी मोदी सरकार कारवाई करण्याऐवजी चूप बसले आहे. अदानी समूह स्टेट बँक ऑफ इंडिया, एल. आय.सी. बँक ऑफ इंडिया या प्रशासनाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हा काँग्रेसच्यावतीने सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता निषेध आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, माजी आमदार ईश्वर जाधव, महानगर अध्यक्ष शाम तायडे, युवक शहराध्यक्ष मुजीब पटेल, प्रदीप पवार, प्रदीप सोनावणे, शंकर राजपूत, साकीना तडवी, ऐश्वर्या राठोड, अनिल निकम, देवेन्द्र सिंग पाटील, जगदीश गाढे ज्ञानेश्वर कोळी, रमेश शिंपी, रवी जाधव, भारत पाटील, कादिर खान, अनिल जंजाळे, पुंजाजी पाटील, फैजान शहा आदी उपस्थित होते.

Protected Content