एसबीआय बँकेतून वृध्देचे ४१ हजाराची रोकड लांबविले; पारोळा येथील घटना

पारोळा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील स्टेट बँक ऑफ इंडीया येथे आलेल्या ६५ वर्षीय महिलेचे ४१ हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, मालुबाई कैलास पाटील (वय-६५) रा. पाळसखेडे ता. पारोळा ह्या कामाच्या निमित्ताने २३ मार्च रोजी पारोळा येथील स्टेट बँक ऑफ इंडीयात आले होते. त्यावेळी त्यांच्या जवळील ४१ हजाराची रोकड अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे दुपारी १२ वाजता उघडकीला आला. पैश्यांची रोकड लंपास झाल्याची लक्षात येताच एकच खळबळ उडाली होती. यावेळी वृध्द महिलेने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार बापुराव पाटील करीत आहे.

Protected Content