रावेर प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला. जळगाव येथील एस.टी. कार्यशाळेत हेड मेकॅनिक असलेले राजेंद्र पाटील यांचा मुलगा निखिल पाटील यांची नायब तहसीलदार या राजपत्रित अधिकारी या पदावर निवड झाली आहे. क्रीडा प्रवर्गातून राज्यात प्रथम तसेच संपूर्ण निकालातील सर्वात कमी वयाचा तरुण अधिकारी ठरला आहे.
चिकाटीबाज निखिल
निखिल हा रावेर तालुक्यातील गहुखेडा येथील कै एकनाथ गोमाजी पाटील यांचा नातू जळगाव येथील एस.टी. कार्यशाळेत हेड मेकॅनिक असलेले राजेंद्र पाटील यांचा मुलगा आहे. निखिल हा रायफल शुटींग मध्ये राष्ट्रीय खेळाडू असून त्याला रायफल शुटींगमध्ये अनेक बक्षिसे मिळाली आहेत. निखिल हा एम.कॉम उत्तीर्ण झाला असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील रायफल शूटर निखिल खूपच चिकाटीबाज आहे.शुटींगसाठी त्याला रायफल आम्ही इटलीहून आणून दिली आहे.राज्यात प्रथम वर्ग अधिकारी होण्याचा त्याने ध्यास घेतला आहे. निखिल पाटील याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व थरातून कौतुक होत आहे.