जळगाव प्रतिनिधी । शहरातील एसएमआयटी महाविद्यालयाजवळून वृध्द व्यक्तीची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जयंत पुरूषोत्तम लाड (वय-६४) रा. एसएमआयटी महाविद्यालय जळगाव हे सेवानिवृत्त कर्मचारी आहे. ते आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. घराच्या उपायोगासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ डीएफ ६६७०) क्रमांकाचची मोपेड दुचाकी आहे. मंगळवार ४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता त्यांनी त्यांची मोपेड गाडी त्यांच्या घराच्या समोर पार्किंग करून लावली होती. दरम्यान, सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास ते बाहेर आले असता त्यांनी दुचाकी आढळून आली नाही. गेल्या चार दिवसांपासून त्यांनी परिसरात दुचाकीचा शोधाशोध केली परंतू कोठेही मिळून आली नाही. अखेर शनिवारी ८ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे करीत आहे.