Home Cities एरंडोल एरंडोल येथे सम्यक इंग्लिश स्कूलतर्फे वृक्ष दिंडीचे आयोजन

एरंडोल येथे सम्यक इंग्लिश स्कूलतर्फे वृक्ष दिंडीचे आयोजन

0
29

एरंडोल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील सम्यक इंग्लिश स्कूलमध्ये दरवर्षी जुलै महिन्यात वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात येते. यानुसार शाळेतर्फे आज दि. ९ जुलै रोजी वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले.

 

मुलांना विद्यार्थीदशेत पर्यावरण संवर्धनाची जाणीव व्हावी व त्यांच्या मनात वृक्ष लागवडीची भावना रुजावी याकरिता वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीच्या माध्यमातून शहरात जनजागृती करण्यात आली. यातून पर्यावरण समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या वृक्ष दिंडीने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले ह्तोये. वृक्ष दिंडीतील वारकरी अर्थात विद्यार्थ्याना शिक्षकांनी वृक्ष लागवड व जोपासनाबाबत मार्गदर्शन केले.


Protected Content

Play sound