एरंडोल प्रतिनिधी । शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शिवसेना कार्यालयात ध्वजपुजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे तसेच हिंदु हृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदाताई पाटील, शिवसेना उपजिल्हा संघटक किशोर निंबाळकर, तालुका प्रमुख वासुदेव पाटील, पचांयत समिती उपसभापती अनिल महाजन, सदस्य विवेक पाटील, युवा सेना तालुका प्रमुख बबलू पाटील, युवा सेना शहरप्रमुख अतुल महाजन, उपतालुका प्रमुख रविंद्र चौधरी, चिंतामण पाटील, युवा सेना शहर समन्वयक अमोल भावसार, आनंदा चौधरी, चंदुभाऊ जोहरी, उपशहरप्रमुख सुनील मराठे, पंकज चौधरी, परेश बिर्ला, कुणाल पाटील, किशोर पाटील, बाळासाहेब पाटील, पद्माकर मराठे, राहूल भोई, तुषार शिंपी, राजेश महाजन, योगेश महाजन, गोपाल महाजन, रमेश महाजन, जयेश महाजन, भुरा महाजन आदी शिवसैनिक उपस्थित होते.
एरंडोल येथे शिवसेनेतर्फे जाहीर निषेध
एरंडोल तालुका व शहर शिवसेनेतर्फे चीनने केलेल्या भारतावर हल्ल्याच्या निषेधार्थ जाहीर निषेध करण्यात आला व शिवसेना कार्यालयाजवळ चीनचे राष्ट्राध्यक्ष जिंपिंग व चीनचा ध्वज जाळून चीनने भारतावर केलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हा उपसंघटक किशोर निंबाळकर, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, शहर युवाप्रमुख अतुल महाजन, परेश बिर्ला, सुनील मराठे, पंकज चौधरी, कुणाल पाटील, चंदू जोहरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.