एरंडोल प्रतिनिधी । पालघर येथील जमावाने दोन साधुंसह चालकाचा हत्याप्रकरणी येथील विश्वहिंदू परिषद बजरंग दलातर्फे निषेधार्थ तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महंत स्वामी कल्पवृक्षगिरी, सुशिल गिरी व त्यांच्या वाहन चालकाची पालघर जिल्ह्यातील गडचिंचले या गावाजवळ जमावतर्फे निर्घृण हत्या करण्यात आली. लॉकडाऊनमध्ये एवढा जमाव झालाच कसा ? असा प्रश्न विचारला असुन महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थे बाबत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे असे म्हटले आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याने संतांचीच हत्या होणे हे वर्तमान सरकारचे अपयश असल्याचे देखील म्हटले आहे. या घटनेत स्थानिक चर्च व वामपंथी विचार धारेच्या कार्यकर्त्यांचा हात आहे का ? हे तपासण्यात यावे अशी सुचना देखील केली आहे. इतक्या निर्घृण हत्ये प्रकरणी मानवी हक्क संघटना व लिबर्टी फ्रॉम फ्रीडमचे कार्यकर्ते काहीच करीत नसल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. शेवटी या अमानवीय कृत्याचा निषेध करुन संत समाजाबद्दल महाराष्ट्रात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊ नये अशी दखल घेण्याचे महाराष्ट्र शासनास म्हटले आहे. निवेदनावर भरत महाजन प्रखंड संयोजक, शंतनु भेलसेकर शहर संयोजक, विवेक ठाकुर, करण पाटील आदींच्या सह्या आहेत.