एरंडोल प्रतिनिधी । ओबीसींच्या आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे धरणगाव चौफुली येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी चारही बाजूंनी वाहनांची रांग लागली होती.
भाजपा ओ.बी.सी.सेल मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले असल्याचा आरोप यावेळी केला. सर्व ओबीसी बांधवांचा विश्वासघात या महाराष्ट्रातील आघाडी सरकारने केला असल्याचे सांगून हे आरक्षण पूर्ववत लागू करावे व ओबीसी बांधवांना न्याय मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टी एरंडोल तालुकातर्फे आंदोलन करण्यात आले असल्याचे सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्ष रमेश परदेशी , माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, अमोल जाधव, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, ॲड. नितीन महाजन, डॉ.नरेंद्र पाटील, डॉ.नंदलाल सोनार, उद्योग आघाडी माजी जिल्हाध्यक्ष सचिन सोनार,वाल्मीक सोनवणे, प्रशांत महाजन, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष लोकेश महाले, प्रदीप पाटील, विकास सोनवणे, सरपंच खडके, मयूर वाणी, जितेंद्र महाजन, शुभम राजपूत, अनिल महाजन तसेच एरंडोल तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रिनिधी, महिला आघाडी, युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा, बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/184670593600754