एरंडोल प्रतिनिधी । येथे काँग्रेस पक्षातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात १५० जणांनी रक्तदान केले.
महात्मा फुले हायस्कूल येथे कोरोना ( कोविड १९) या आजाराच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन एरंडोल काँग्रेस यांच्या तर्फे करण्यात आले. यासाठी रेड प्लस ब्लड बँक संस्थेने सहकार्य केले तसेच रेड प्लस बँकेचे डॉ.भरत गायकवाड,सुरज पाटील,रविंद्र पाटील,दिपक पाटील,संजना इंगळे,उदय पाटील यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी सुमारे १५० लोकांनी रक्तदान केले. या शिबिराचे आयोजन एरंडोल तालुका काँग्रेस व युवक काँग्रेस,शहर काँग्रेस , महिला काँग्रेसतर्फे करण्यात आले होते. या प्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय महाजन , शहराध्यक्ष संजय भदाणे,युवक काँग्रेस अध्यक्ष इम्रान सय्यद, संजय कलाल,सुकलाल महाजन, डॉ. फरहाज बोहरी, आरिफ मिस्तरी, जब्बार मिस्तरी, राकेश चौधरी, डॉ.बापू चौधरी उपस्थित होते.