Home आरोग्य एरंडोल येथे आढळले दोन कोरोना बाधीत रूग्ण

एरंडोल येथे आढळले दोन कोरोना बाधीत रूग्ण

0
65

एरंडोल प्रतिनिधी । येथे आज दोन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून त्यांच्या रहिवासाचा परिसर असणार्‍या भागात फवारणीसह कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, रात्री उशिरा माळी वाडा येथील ८४ वर्षीय पुरुष जे जळगाव येथील खाजगी व नंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर आज दि.४ जुन रोजी संध्याकाळी मिळालेल्या माहिती नुसार जोहरी गल्ली येथील ४० वर्षीय पुरुष जे जळगाव येथे उपचार घेत होते त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७ झालेली असुन दोन रुग्ण मृत झालेली आहेत.


Protected Content

Play sound