एरंडोल, प्रतिनिधी | येथील पोलिस स्थानकात अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय महाजन यांनी केले आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिले आहेत.
पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेत्री कंगना रणौत ( राणावत ) यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारताला सन: १ ९ ४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे भिकेत मिळालेले असल्याचे विधान केले होते. तसेच खरे स्वातंत्र हे सन: २०१४ मध्ये मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हे विधान महापुरुषांचा अवमान करणारे आहे. दरम्यान भारतीय स्वातंत्र्यांचे ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे . अशात एका अभिनेत्रीने असे कथन करणे हे अपमास्पद बाब आहे. एवढेच नव्हे तर ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याठी आपल्या संसाराची होळी केली. आणि जीवाची पर्वा न करता इंग्रजाविरुध्द लढा दिला. त्यांच्यासह सर्व सामान्य माणसाचा अवमान आहे. यामुळे अनेक नागरीकांच्या भावनेला ठेच पोहचली आहे. त्यामुळे यांचे जाहीर निषेध नोंदवून अभिनेत्री कंगना रणौत ( राणावत ) यांचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच दिलेला पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.