एरंडोल, प्रतिनिधी । येथील नगर पालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणाऱ्या शहरातील दुकानदार व व्यापाऱ्यांवर कारवाई करीत ९३ हजार ५०० रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
मास्क न वापरल्यामुळे ४१ हजार रुपये .,दुकानात ५ पेक्षा जास्त नागरिक आढळल्याने ३९ हजार रुपये .,सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ४ हजार रुपये तर सामाजिक अंतर न पाळणाऱ्यांकडून ९ हजार ५०० रुपये असे एकूण ९३ हजार ५०० रुपयांचा .दंड वसूल करण्यात आला आहे. याबाबतीत मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिक,दुकानदार व व्यापारी यांनी नियमांचे पालन करावे व कटू प्रसंग टाळावा. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी आवश्यक असल्यास घराच्या बाहेर पडावे, मास्क लावणे,सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे, सामाजिक अंतर पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांना तब्येत दाखवा अशा सुचना शहरातील नागरिकांना केल्या आहेत.
सदर उपक्रमात मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधिक्षक संजय धमाळ,क्षेत्रीय अधिकारी एस. आर. ठाकुर, डॉ.योगेश सुकटे, भुषण महाजन, रघुनाथ महाजन, अशोक मोरे, वैभव पाटील, आशिष परदेशी, प्रकाश सुर्यवंशी, गौरव महाजन, लक्ष्मण ठाकुर यांचे पथक परिश्रम घेत आहे.