एरंडोल प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एरंडोल नगरपालिका व डॉक्टर असोसिएशनच्या वतीने शहरातील मोहल्ला क्लिनिकच्या माध्यमातून पालिका सभागृहात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली.
यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, नगराध्यक्ष रमेश परदेशी, मुख्याधिकारी किरण देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख तसेच डॉक्टर्स असोशियनचे डॉ.सुधीर काबरा, डॉ. फरहाज बोहरी, डॉ.सुयश पाटील, डॉ.राहुल वाघ आदी उपस्थित होते.
यावेळी एरंडोल नगरपालिका हद्दीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रतिबंध उपाय म्हणुन शहरातील काबरे विद्यालय, जोहरी गल्लीतील समाज मंदिर व पांडव वाडा, जाखेटे भवन हॉल या ठिकाणी संशयित रुग्णांची लवकरात लवकर निदान होण्याच्या दृष्टीने तपासणी करण्यासाठी शहरातील खाजगी तज्ञ डॉक्टर व सरकारी डॉक्टर यांच्या मदतीने मोहल्ला क्लिनिक द्वारे तपासणी करण्यात येणार असल्याचे ठरले ज्यामुळे लोकांच्या मनातील भीती दुर होण्यास मदत होणार आहे.