एरंडोल प्रतिनिधी। येथील शासकीय मुलांचे वसतीगृह येथील कोविड सेंटर मधील १८ कोरोना रुग्ण आज संध्याकाळी बरे होऊन परतले. गेल्या आठ दिवसांपासून ते रुग्ण या सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल होते.
आज शासकीय मुलांचे वसतीगृह येथील कोविड सेंटरमधून डिस्चार्ज झालेल्यांमध्ये एरंडोल येथील १२ , फरकांडे २ , विखरण १ , सोनबर्डी २ आणि मुसळी येथील एकाचा समावेश होता. एरंडोलचे प्रांताधिकारी विनय गोसावी , तालुका वैद्यकीय अधिकारी फिरोज शेख , समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. राकेश झोपे , डॉ. योगीराज पळशीकर , फार्मासिस्ट श्री. हेमंत आणि नर्सिंग स्टाफ उपस्थित होता. सध्या एरंडोल येथील शासकीय मुलांचे वसतीगृह येथे ३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. कालच या केंद्राला जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन विविध सोय सुविधांची पाहणी केली आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्यात. या कोविड सेंटरमध्ये तालुक्यातील अनेक रुग्ण योग्य उपचार घेऊन परतले आहेत. आज सायंकाळी १८ बरे झालेल्या रुग्णांना निरोप देण्यात आला..यावेळी आनंदाने टाळ्यांची दाद देत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.