एरंडोल, प्रतिनिधी | येथील तहसील कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधान दिनानिमित्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी शपथ घेतली.
तहसील कार्यालयात संविधान दिन उत्सहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार सुचिता चव्हाण,नायब तहसीलदार एस. पी.शिरसाठ, राजेंद्र अहिरे, मनोज शिंपी, मधुकर नंदनवार, किशोर माळी, सुयोग कुलकर्णी, भालचंद्र गवळी, ज्ञानेश्वर राजपूत, नंदकिशोर वाघ, शिवाजी महाजन, रमेश परदेशी, योगेश्री तोंडे, स्मिता महाजन, सविता बर्गे आदी उपस्थित होते.