जळगाव प्रतिनिधी । एमबीए कोर्सच्या नावाखाली विद्यार्थ्यांना बोगस सर्टिफिकेट देत त्यांची लाखो रुपयात फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहरातील मोशन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् इन्स्टीट्यूटचे संचालक संहिता नितीन पाटील व नितीन पंढरीनाथ पाटील यांच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फसवणूक झालेला विद्यार्थी चेतन गुणवंत पाटील (वय २८, रा. भुसावळ) याने दिलेल्या फिर्यादीनुसार माहिती अशी की, चेतनने मोशन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, भास्कर मार्केट जळगाव येथे एमबीए पदवीसाठी प्रवेश घेतला होता. प्रवेशावेळी इन्स्टीट्यूटच्या संचालीका शैलजा नितीन पाटील व नितिन पंढरीनाथ पाटील (रा. मक्ताईनगर, एसएमआयटी कलेज जवळ, जळगाव) हे तेथे हजर होते. व चेतन यास सांगीतले की, आमचे इन्स्टीट्यूट व प्राध्यापक आणि इतर
कर्मचारी एआयसीटीईकडून मान्यता प्राप्त असून या सदर कोर्सची फी सुमारे ३ लाख रुपये असून त्या शिष्यवृत्ती व फि संबंधी माहिती देत एआयसीटीई मान्यता प्राप्त पदवी पदवीचे अश्वासन दिले होते. त्यानुसार चेतन याने संस्थेचे लिपीक दीपक पाटील यांच्याकडे रोख ११ हजार देऊन प्रवेश अर्ज घेतले. त्यानंतर ५ जून २०१७ रोजी १५ हजार दीपक पाटील यांच्याजवळ ॲडव्हॉन्स फि म्हणून जमा केले. यावर इन्स्टीट्यूटच्या संचालीका शैलजा नितिन पाटील यांनी चेतन व त्याचा सोबतचा शुभम अशोक जैसवाल याला बोगस व बनावट एआयसीटीई केंद्र सरकार यांचे बनावट लेटर प्रिंट काढून दिली. त्यानंतर चेतन, शुभम यांच्यासह आकाश संजय दीक्षित पायल, उदय मंत्री आदी विद्यार्थ्यांचे लेक्चर नियमित सुरु झाले. त्यानंतर प्रथम सेमिस्टरची परीक्षा होऊन चेतन यास हिवाळी शिबिरा अंतर्गत पुणे येथे एका नामांकीत हॉस्पीटल येथे इंटर्नशिप येथे पाठविण्यात आले. इंटर्नशिप झाल्यानंतर चेतन यास एमबीए हेल्थकेअर मॅनेजमेंटचे प्रशिस्तीपत्र देण्यात आले. मात्र हे प्रशिस्तीपत्र व इतर सर्टिफिकेट हे बोगस निघाले. दरम्यानच्या काळात चेतन याने फी पोटी १ लाख ९५ हजार रुपये भरले. मात्र त्याबदल्यात त्याला बोगस सर्टिफिकेट मिळाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चेन व इतर विद्यार्थ्यांनी माहिती अधिकारात वेगवेगळी माहिती मागविली असता सदर संस्था ही बोगस असल्याचे समोर आले. यासह या संस्थेला एआयसीटीची कुठलीही मान्यता नसल्याचे समोर येत आपल्यासह इतर विद्यार्थ्यांची लाखो रुपयात फसकणूक झाल्याचे लक्षात आल्याने चेतन पाटील याने दि. ७ रोजी जिल्हापेठ पोलिसात फिर्याद दिल्याने संस्थेच्या संचालिका शैलेजा नितीन पाटील व नितीन पंढरीनाथ पाटील यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.