एमआयडीसी परिसरातून प्रौढ व्यक्ती बेपत्ता

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील ढोर बाजार परिसरातून ४६ वर्षीय प्रौढ व्यक्ती हे गावाला जावून येतो असे सांगून बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. याबाबत  एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. कालू नानकराव कासदे (वय-४६) रा. हर्सूल जि.खंडवा मध्यप्रदेश ह.मु. ढोर बाजार, एमआयडीसी, जळगाव असे बेपत्ता झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एमआयडीसी भागातील ढोर बाजार परिसरात कालू कासदे हा वास्तव्याला आहे. त्यांच्या सोबत मेहुणे साबुलाल बाबुलाल पालवे हा तरूण देखील राहतो. कालू कासदे याचे मुळ गाव मध्यप्रदेशातील हर्सूल येथे असल्याने २९ एप्रिल रोजी मुळ गावी जावून येतो असे साबुलाल पालवे याला सांगून घरातून गावाला जाण्यासाठी निघाला. दरम्यान, कालू हा त्याच्या मुळ गावी न जाता कुठेतरी काहीही न सांगता निघून गेला. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतू कालू कासदे याची कुठेही काहीही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवारी २ मे रोजी दुपारी १ वाजता साबुलाल बाबुलाल पालवे याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून महिती दिली. त्यांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राजपूत करीत आहे.

Protected Content