जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणू आजाराच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहत परिसरातील जवळपास ८५ कंपन्या बंद अवस्थेत आहे. त्यामुळे विविध सेक्टरमध्ये कमालीची शांतता दिसून येत आहे. केवळ तीन ते चार दालमिल, चार ते पाच केमिकल कंपन्या परवानगी घेवून सुरू आहे तसेच गेल्या सहा दिवसांपासून सुप्रिम कंपनी सुरू झाली आहे. मात्र प्लस्टिकवर आधारित विविध कंपन्या पुर्णत: बंद अवस्थेत आहेत.
जळगावच्या एमआयडीसी परिसरात सुमारे ४५० विविध उत्पादन करणारे कारखाने आहे. त्यातील १५० कारखाने चार पाच वर्षांपासून बंद पडलेल्या आहे. अनेक कारखानदारांनी कामगार कपातही केली आहे. ज्याना कारखाने सुरू करायचे असतील त्यांना रितसर परवानगी घ्यावे लागते अश्यातच अत्यंत जाचक अटी असल्याने कारखानदार कंपनी सुरू करण्यास धजावत आहे. त्यामुळे आपला उद्योग सध्यस्थितीत बंद ठेवणे पसंत केले आहे. सध्या अनेक कारखाने कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. तर काही कंपन्यातील कामगारांना दोन तीन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने त्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.