जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसीतील श्री इंजिनिअरींग कंपनीच्या गेटच्या बाजूला उभी दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी सोमवार, १९ जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव तालुक्यातील आसोदा गावात विलास बाळू कोळी वय ३० हे राहतात. ते वाहनचालक आहेत. १४ जून रोजी विलास कोळी हे दुचाकीने एमआयडीसी परिसरात आले होते, यादरम्यान त्यांनी त्यांची एम.एच.१९ बी.डब्लू २८७९ क्रमाकांची दुचाकी श्री इंजिनिअरींग या कंपनीच्या मेनगेटच्या बाजूला उभी केली होती. काम आटोपून काही वेळातच परतले असता, त्यांना त्यांची दुचाकी दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने पाच दिवसानंतर विलास कोळी यांनी सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील हे करीत आहेत.